दिल्‍ली -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाच्या धडकेत सहा ठार   

 

पाच स्वच्छता कर्मचारी गंभीर जखमी 

गुरुग्राम : दिल्‍ली -मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनाची धडक बसून सहा स्वच्छता कर्मचारी ठार तर, पाच जखमी झाले. नूह जिल्ह्यातील फिरोझपूर झिरका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इब्राहिमबास गावााजवळ शनिवारी सकाळी अपघात झाला.
 
जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. द्रुतगती मार्गावर ११ कर्मचारी स्वच्छतेचे काम करत होते. वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्ग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख पटली नसल्याची माहिती ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली. मात्र, ते खेरी कलान गावचे रहिवासी असल्याचे आणि त्या पैकी एक झिमरावत गावचा आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. वाहनचालकावर कारवाई केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्हीतील दृश्ये पाहिल्यानंतर अपघाताचे नेमके कारण उघड होणार आहे. जखमींवर उपचार सुरु असून तपास सर्व बाजूंनी केला जात असल्याचे अधिकारी म्हणाले.

Related Articles